Ad will apear here
Next
‘सिंहगड’मध्ये माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत


कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कुसगाव येथील एस.के.एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ने दिलेल्या ज्ञान व कौशल्याच्या शिदोरीवरच मार्गक्रमण करत असल्याचे सांगून ‘सिंहगड’विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

श्याम बिराजदार यांनी ‘सिंहगड’च्या प्लेसमेंटबद्दल अभिनंदन करून महाविद्यालयाला व संस्थेला शुभेच्छा दिल्या. पूजा पवार यांनी महाविद्यालयाच्या एकूणच प्रगतीची प्रशंसा केली. नवनाथ नाळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही घडलो याची आम्हास कायम आठवण राहील, असे भावपूर्ण उद्गार काढत पुन्हा एकदा कॉलेजला आल्यासारखे वाटते, असे मनोगत व्यक्त केले.

या वेळी प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले, विभागप्रमुख प्रा. नामदेव गावडे, प्रा. गणेश कदम प्रा. राजेश्वरी थाडी, प्रा. प्रशांत चौगुले, प्रा. सत्येंद्र कोठारी व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZKMBY
Similar Posts
‘सिंहगड’मध्ये पुलवामातील शहीदांसाठी कॅन्डल मार्च कुसगाव : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंहगड लोणावळा कॅम्पसच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व प्राचार्यांनी उत्स्फूर्तपणे कॅन्डल मार्च काढला.
लोणावळ्यातील सिंहगड संकुलात कार्यशाळेचे आयोजन कुसगाव : येथील सिंहगड संकुल आणि जारो एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड संकुलात राज्यस्तरीय कार्यशाळा नऊ जुलैला आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून एकूण ५२ ट्रेनिंग व प्लेसमेंट आधिकारी या वेळी वेळी उपस्थित होते.
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ची जॉब प्लेसमेंटमध्ये भरारी पुणे : येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत झालेल्या जॉब कॅम्पस प्लेसमेंटमधून जवळपास एक हजार ९४५ मुलांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून, अजूनही कॅम्पस प्लेसमेंट चालू आहे. या कॅम्पस प्लेसमेंटमधून दोन हजारांपेक्षा अधिक मुलांना नोकरी मिळणार आहे.
सिंहगड लोणावळा संकुलमध्ये शिवजयंती उत्साहात कुसगाव : येथील सिंहगड लोणावळा संकुलामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language